लष्करप्रमुखांनी घेतला सुरक्षेचा आढावा   

श्रीनगर : लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शुक्रवारी जम्मू आणि काश्मीरचा दौरा केला. त्या अंतर्गत त्यांनी सुरक्षेचा आढावा घेतला. या वेळी त्यांच्या सोबत उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एम. व्ही. सचिंद्र कुमार होते. 
 
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरची सुरक्षा विषयक परिस्थिती कशी आहे ? याचा आढावा त्यांनी काल घेतला. हल्ल्यानंतर काय पावले उचलायची ? याबाबात अधिकार्‍यांशी त्यांनी चर्चा केली.गुरुवारी रात्री नियंत्रण रेषेवर काही ठिकाणी चकमक उडाली होती. त्यानंतर काही तासांत द्विवेदी दौर्‍यावर आले आहेत. 

Related Articles